मनसे नेते वसंत मोरे भावी खासदार, पुण्यात मनसेकडून जोरदार बॅनरबाजी

| Updated on: Jun 13, 2023 | 2:55 PM

VIDEO | पुण्यात भावी खासदाराच्या स्पर्धेत मनसेची उडी, वसंत मोरे यांचे झळकले बॅनर

पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्त जागेवर आता कधीही पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेवर अनेक इच्छुकांनी दावा केल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून शहरात बॅनर झळकले होते. पुण्यातील वडगाव भागात हे बॅनर लावण्यात आले होते. तसेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचेही भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले होते. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांची तयारी आहे. आता मनसेकडून वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून शहरात बॅनर्स लागले आहे.राज ठाकेर यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा फलकांमध्ये वसंत मोरे यांचा उल्लेख भावी खासदार म्हणून केला आहे.

Published on: Jun 13, 2023 02:55 PM
जाहिरातीवरून घमासान! भाजप नेत्याकडून सुचक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘कुणाचं महत्व…’
बिहारच्या राजकारणात भूकंप; अल्पसंख्याक कल्याण मंत्री संतोष सुमन यांचा राजीनामा