मनसे नेते वसंत मोरे ‘शिवतीर्था’वर राज ठाकरेंच्या भेटीला, काय झाली चर्चा?
मनसे नेते वसंत मोरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीला, काय होतं भेटीमागचं कारण?
मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. भोर विधानसभेसाठी मनसेकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. भोर विधानसभेसाठी मनसेकडून सुरू असलेल्या मोर्चे बांधणीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे हे आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. भोर, वेल्हा आणि मुळशी या तीन तालुक्यांना मनसेकडून तीन नवे तालुका अध्यक्ष देण्यात आले आहे. शिवतीर्थावर झालेल्या भेटीदरम्यान या तीन तालुक्यातील तालुका अध्यक्षांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.