मनसे नेत्यांनी उडवली उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मुलाखतीची खिल्ली, बघा काय म्हणले?

| Updated on: Jul 27, 2023 | 9:37 AM

VIDEO | ठाकरे गट-मनसेमध्ये वादाची ठिणगी पडणार? मनसे नेत्यांनी केली उद्धव ठाकरे अन् संजय राऊत यांची नक्कल

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी काल मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान सामनासाठी घेण्यात आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याकडून खिल्ली उडवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे तर संतोष धुरी यांनी संजय राऊत यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान यापूर्वीही मनसे अध्यक्ष यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांची भर सभेत नक्कल केली असल्याचे पाहायला मिळाले होते. आता मनसे नेत्यांनी देखील या दोन्ही नेत्यांची खिल्लीच उडवली आहे. बघा व्हिडीओ….

Published on: Jul 27, 2023 09:24 AM
महाराष्ट्रात धुवाँधार, रत्नागिरी जिल्ह्यातही कोसळधारा!; हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’
शिवसेनेतले फुटीर जर मातोश्रीवर आले तर..? उद्धव ठाकरे म्हणाले…