ही धमकी समजा नाहीतर… , राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा

| Updated on: Apr 23, 2024 | 12:14 PM

बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसेचे नेते महायुतीच्या प्रचारात उतरलेत. त्यावरून ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसेने इशारा दिलाय. या टीकेवर पलटवार करताना मनसे नेते अमेय खोपकरांनी चांगलाच हल्लाबोल केलाय.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये राणे आणि ठाकरे विरूद्ध वाक् युद्ध रंगण्याआधी मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत वाद सुरू झालाय. बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसेचे नेते महायुतीच्या प्रचारात उतरलेत. त्यावरून ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसेने इशारा दिलाय. या टीकेवर पलटवार करताना मनसे नेते अमेय खोपकरांनी चांगलाच हल्लाबोल केलाय. ‘तुम्ही आमच्या साहेबांवर खालच्या पातळीची टीका करणार असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. तुमच्यासारखी घाणेरडी पातळी आम्हाला गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढं लक्षात असू दे.. ही धमकी समजा नाहीतर खुलं आव्हान आता होऊनच जाऊ दे…’, राज ठाकरेंवर विनायक राऊतांनी केलेल्या टीकेवर बघा मनसे नेते नेैमकं काय म्हणाले?

Published on: Apr 23, 2024 12:14 PM
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
भिवंडीत भाजपचं ‘कमळ’ फुलणार की शरद पवारांची ‘तुतारी’ वाजणार?