Kalyan : ‘त्या’ प्रकरणावरून मनसे आक्रमक, राजू पाटील यांनी फेरीवाल्यासह गाठलं पोलीस स्टेशन अन्…
VIDEO | मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील आणि कार्यकर्त्यांनी थेट कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठलं, मनसे आमदारासह कार्यकर्त्यांचा पोलिसांसमोर पालिका अधिकाऱ्यांना दिला इशारा
कल्याण, ४ ऑक्टोबर २०२३ | कल्याण स्कायवॉकवर मराठी भाषेवर अपशब्द वापरणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांनी बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करत फेरीवाल्यांनी मराठी भाषेवर विधान केलं तर मनसे स्टाईल दाखवण्याचा इशाराही दिला होता. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी 6-7 मनसे कार्यकर्त्यांविरोधात 24 तासानंतर फेरीवाल्याचा जाब नोंदवून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला. यानतंर संतप्त मनसे पदाधिकारी आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमानेंशी याविषयी चर्चा केली. यावेळी मनसेकडून पोलीस दबाव टाकत फेरीवाल्यांना तक्रार देण्यासाठी सांगत असल्याचा त्यांच्या निदर्शनास आणून ज्या फेरीवाल्याला मारहाण झाली होती त्या फेरीवाल्याल पोलिसांच्या समोर उभे केले, मात्र पोलिसांवर आरोप होत असल्याने पोलिसांनी त्या फेरीवाल्याला कार्यालयाच्या बाहेर काढत त्याच्यावर मनसेने दबाव टाकला असल्याचे सांगितले. यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा अन्यथा ज्यांच्या जीवावर फेरीवाले बसतात त्या अधिकाऱ्यांनाच ठोकू, असा इशाराही त्यांनी दिला.