रेल्वे तिकीटाचा काळाबाजार; मनसे नेता आक्रमक, कोकण प्रवाशांना केले ‘हे’ आवाहन

| Updated on: May 23, 2023 | 12:23 PM

VIDEO | रेल्वे तिकीटाच्या काळाबाजाराला बसणार चाप, मनसे आमदार राजू पाटील यांचं कोकणातील प्रवाशांना आवाहन

ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या कोकणवासी यांच्या पदरी निराशा पडली आहे. गणेशोत्सवापूर्वी दोन दिवसाचे म्हणजेच 17 सप्टेंबरचे आरक्षण खुले होतात. अवघ्या तीन मिनिटात हे आरक्षण फुल झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान कोकणवासीयांच्या मदतीला मनसे आमदार राजू पाटील सरसावले आहेत. ठाणे, कल्याण, पालघरपर्यंत कोकणवासी मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये या भागातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामुळेच या प्रवाशांना आरक्षण न मिळाल्याने आमदार पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पत्र लिहीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच कोकणवासीयांसाठी नव्याने गाड्यांची सोय करत त्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. याचवेळी रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार राज्याबाहेरून होत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर दलाल सक्रिय आहेत जे जनतेला वेठीस धरत आहेत. म्हणूनच असे दलाल नजरेस पडल्यास त्यांना मनसे स्टाईल दाखवणार असल्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे .तर प्रवासी जनतेला आवाहन करताना त्यांनी अशा प्रकारे रेल्वेचा काळाबाजार करणारे दलाल नजरेस पडले तर आमच्या मनसे कार्यकर्त्यांसमोर त्यांना द्या मग त्यांना दलाली काय असते ते दाखवतो असा सज्जड दम देखील त्यांनी दिला आहे

Published on: May 23, 2023 12:23 PM
मंत्रिमंडळाचा विस्तार बच्चू कडूंची प्रतिक्रिया; ”आमंत्रण! घोडा मैदान…” अन् केली ‘ही’ मागणी?
गुवाहटीच्या ‘त्या’ टीकेवरून शहाजी बापूंनी संजय राऊत यांना फटकारलं, म्हणाले…