आम्ही त्यातले नाही हे आता उघडं पडलंय, मनसे आमदाराची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका काय?

| Updated on: Nov 22, 2023 | 10:52 PM

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 'त्या' फोटोवरून राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील भाष्य करून सडकून टीका केली आहे. राज्याला उत्पन्न मिळेल अशा गोष्टींना विरोध करायचा. आम्ही त्यातले नाही असं बोलायचं हे सगळं उघडकीस आलं आहे, असे राजू पाटील म्हणाले.

ठाणे, २२ नोव्हेंबर २०२३ : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ फोटोवरून राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील भाष्य करून सडकून टीका केली आहे. राजू पाटील म्हणाले, कॅसिनो हे उत्पादनाचे साधन महाराष्ट्राला लागून असलेल्या गोव्यात आहे. महाराष्ट्रात कॅसिनो होऊ दिले नाही. गोव्यात बीजेपीची सत्ता आहे. कुठेतरी आपण साहू सारखं वागायचं. राज्याला उत्पन्न मिळेल अशा गोष्टींना विरोध करायचा. आम्ही त्यातले नाही असं बोलायचं हे सगळं उघडकीस आलं आहे, असे म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे ज्या कॅसिनोत बसलेले आहेत, मी स्वतःही त्या कॅसिनो मध्ये गेलेलो आहे. कॅसिनो खेळणे म्हणजे जुगाराच्या आहारी गेलेले असं नाही माणूस टाईमपास म्हणूनही जातो. हे त्यांनी मान्य करावं असं म्हणत राजू पाटील यांनी बावनकुळे यांना सल्ला दिला आहे.

Published on: Nov 22, 2023 10:51 PM
आधी गंभीर आरोप आता म्हणताय, चंद्रशेखर बावनकुळे यांचं बरोबर…, नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
पंकजाताईंना चष्मा लागला… पण अँगल राजकीय? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल, बघा स्पेशल रिपोर्ट