मनसेच्या राजू पाटील यांचा KDMC ला १५ दिवसांचा अल्टिमेटम, काय आहे कारण?
VIDEO | मनसेकडून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला १५ दिवसाची मुदत, अन्यथा आंदोलन करू.. मनसेनं का दिला इशारा?
डोंबिवली : डोंबिवली स्टेशन परिसराला फेरीवाल्याने विळखा घातल्याने प्रवासी आणि नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रिक्षा या देखील नियोजनबद्ध उभ्या नसतात. यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत असतो. याच संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेत हा परिसर फेरीवाला मुक्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच यावेळी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला १५ दिवसाची मुदत मनसेकडून देण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. तसेच हा परिसर फेरीवाला मुक्त झाल्यास त्याठिकाणी तीन ते चार रिक्षा स्टँड होऊ शकतात. तसेच २० अबोली रिक्षा चालतात त्यासाठी रिक्षा स्टँड करून दिलं तर योग्य होईल, अशा सूचना राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना केल्या. स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला नाहीतर आंदोलन करू असे असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.