फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक, कुठं केली बॅनरबाजी अन् दिला इशारा?
VIDEO | महानगरपालिकेच्या आयुक्तांना पंधरा दिवसांचा अल्टिमेट दिल्यानंतर 'फेरीवालामुक्त करण्याची डेडलाईन संपली......आता आमच्याकडे दुर्लक्ष करा !' अशी बॅनरबाजी
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात खुले आमपणे फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटले असून याचा प्रवासी आणि नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. स्टेशन परिसरापासून १५० मीटर परिसर फेरीवाल्यांपासून मोकळा करा, असा आदेश न्यायालयाने दिला असला तरी डोंबिवलीत पाळला जात नाही आहे. स्टेशन परिसरातील फेरीव्याल्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून करवाई केली जाते. मात्र ती कारवाई दिखावा असते, असे अनेक वेळेला सिद्ध झाले आहे. कारवाई केल्यानंतर काही वेळाने फेरीवाले पुन्हा येऊन बसतात हे चित्र नेहमीच झाले आहे. मात्र यावर कोणती ठोस कारवाई केली जात नाही. फेरीवाल्यामुळे प्रवासी आणि डोंबिवलीकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत असतो. या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. आज हे 15 दिवस होत असून आता मनसेकडून डोंबिवली स्टेशन (पूर्व) परिसर फेरीवालामुक्त करण्याची डेडलाईन संपली……आता आमच्याकडे दुर्लक्ष करा ! असा आशयचा बॅनर लावण्यात आहे. फेरीवाल्याविरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे.