महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालावर राज ठाकरे यांचं पहिलं भाष्य, कोर्टाचा निर्णय म्हणजे…

| Updated on: May 12, 2023 | 12:45 PM

VIDEO | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर राज ठाकरे यांचं मिश्किल भाष्य, बघा व्हिडीओ

ठाणे : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचं घोगडं बऱ्याच दिवस भिजत ठेवलं होतं. दरम्यान, काल सुप्रीम कोर्टानं निकाल दिला. यावर अनेक प्रतिक्रिया येताय. अशातच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, असे मिश्किल भाष्य राज ठाकरे यांनी केलं आहे. ते म्हणाले, माझ्याविरोधात केसेस सुरू असताना मला कोर्टाकडून किंवा पोलिसांकडून नोटीस यायची. त्या नोटीशीतील भाषा अत्यंत किचकट असते. त्यातून मला अटक केलीय की सोडलंय हेच कळत नाही. इतकी ती किटकट भाषा असते. काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या. प्रोसेस चुकली असे म्हटले, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधीमंडळाचा गट योग्य ठरणार नाही. बाहेरचाच पक्ष राहिला पाहिजे. मग निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याचा जो निर्णय दिला आहे त्याचं काय होणार? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला तर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर कोर्टाचा निर्णय हा गोंधळात टाकणारा आहे. भयंकर संभ्रम निर्माण करणारा निर्णय आहे तर आता निवडूक आयोग कोणती पाऊलं उचलणारं, असेही राज ठाकरे यांनी म्हणाले आहे.

Published on: May 12, 2023 12:45 PM
शिंदे-फडणवीस राजीनाम्यावर अजित पवार याचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले, वाजपेयी आणि यांच्यात…
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ‘तो’ प्रश्न विचारताच राज ठाकरे भडकले, अन् म्हणाले…