मिंधे, लाचार अन् पैशांनी वेडे… राज ठाकरे यांचा कुणावर बोचरा वार?

| Updated on: Jan 07, 2024 | 10:07 AM

महायुतीचे सरकार ही सहकार चळवळ नसून साहारा चळवळ आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारवर टीका केली. यावरून अजित पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे यांनी स्वतः किती सहकारी संस्था उभ्या केल्या? अजित दादांचा सवाल

मुंबई, ७ जानेवारी २०२४ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कर्जतच्या मनसेच्या सहकार मार्गदर्शन शिबीर मेळाव्यातून चांगलेच बसरल्याचे पाहायला मिळाले. सध्याचे नेते मिंधे आणि लाचार झालेत. तर महायुतीचे सरकार ही सहकार चळवळ नसून साहारा चळवळ आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारवर टीका केली. यावरून अजित पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे यांनी स्वतः किती सहकारी संस्था उभ्या केल्या? असा सवाल करत अजित पवार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून राज ठाकरे यांनी बोचरा वार केलाय. सध्याचे नेते मिंधे, लाचार आणि पैशांनी वेड झाले आहेत. त्यांना स्वाभिमान राहिलेला नाही. असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केले. तर आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात वार-पलटवार सुरू आहे. कुणबी आणि ब्राम्हणांमध्ये जाती-पातींवरून भांडणं सुरू आहे. मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचा डाव असून यामागे बाहेरच्यांच हात असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

Published on: Jan 07, 2024 10:07 AM
नवनीत राणा सहा महिन्यात जेलमध्ये, प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्याने खळबळ
येत्या ६ महिन्यात नवनीत राणा जेलमध्ये जाणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा काय?