राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, ‘तो’ गुन्हा अखेर रद्द; काय आहे प्रकरण ?
राज ठाकरे यांनी तडीपारीची नोटीस न स्विकारल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. २०११ मध्ये राज ठाकरे यांनी कल्याण कोर्टातून जामीन मिळवला होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या काळात झालेल्या प्रकरणासंदर्भात राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई, १० नोव्हेंबर २०२३ | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे. कल्याण पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर नोंदवलेला गुन्हा मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. राज ठाकरे यांनी तडीपारीची नोटीस न स्विकारल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. २०११ मध्ये राज ठाकरे यांनी कल्याण कोर्टातून जामीन मिळवला होता. याप्रकरणी राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या काळात झालेल्या प्रकरणासंदर्भात राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. २०१० मध्ये झालेल्या या निवडणुकीत राज ठाकरे यांना कल्याण डोंबिवली मनपाच्या हद्दीत तडीपारची नोटीस बजावण्यात आली होती. राज ठाकरे यांनी ही तडीपारीची नोटीस न स्विकारल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत राज ठाकरे कल्याणमध्ये आले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.