मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीची ऑफर? राज ठाकरे यांनी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘भाजपची ऑफर पण…’

| Updated on: Aug 14, 2023 | 3:44 PM

VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीची ऑफर?, राज ठाकरे ऑफर स्वीकारणार की नाही? वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक बैठकीत राज ठाकरे यांनी काय म्हटलं?

Follow us on

मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ | भाजपने मनसेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती समोर येत आहे. या बातमीनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याने भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही, असं मोठं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचं म्हटलेलं नाही. त्यामुळे राज ठाकरे हे आगामी काळात भाजपसोबत दिसणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. ‘मला भाजपची ऑफर आली आहे. युती करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. पण मी कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही. भाजपसोबत एकनाथ शिंदे आहेत. आता अजित पवारही आहेत. अजित पवार यांचं भाजप काय करणार आहे हे माहीत नाही. युतीचं नेमकं गणित काय असेल याबाबतही काहीच स्पष्टता नाहीये. त्यामुळे मी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही’, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.