देशभरात ईड्या, काड्यांचे व्यवहार सुरु अन्…; राज ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
VIDEO | बारसू रिफायनरीचा प्रकल्प जैतापूरला का नेत नाही? राज ठाकरे यांचा थेट सवाल
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसविषयी विचारणा केली असता, ते म्हणाले मला याबाबत काही माहिती नाही. पण सध्या देशभरात ड्या, काड्यांचे व्यवहार सुरु आहेत. तुम्ही ज्या गोष्टी करून ठेवता, दुसरं सरकार येतं तेव्हा दाम दुप्पटीने याच गोष्टी तुमच्या विरोधात करतील, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे असे म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावला, यावेळी त्यांनी बारसू रिफायनरीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. जमिनीतील व्यवहारातून होणाऱ्या या गोष्टी आहेत. हजार दोन हजार एकर जमीन पटकन मिळते ही काय गंमत आहे का? याचा अर्थ कोणी तरी जमिनी घेतल्या आहेत. कमी भावात घ्यायच्या सरकारला जास्त भावात विकायच्या हे धंदे आहेत. जैतापूरला काय करणार? ती कंपनी बुडाली. आता काय करणार? जर जैतापूरला जमीन आखून घेतली आहे तर हा प्रकल्प जैतापूरला का नेत नाही? असा सवाल त्यांनी केला.