एकनाथ शिंदे अन् राज ठाकरेंमधल्या संबंधात तणाव, अमित ठाकरेंविरोधातील उमेदवारीनं खटके?

| Updated on: Nov 06, 2024 | 10:26 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संबंधात तणाव आल्याचे पाहायला मिळतंय. कारण प्रचारसभांमधून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करणं सुरू केलंय. माहीमच्या अमित ठाकरेंच्या विरोधातील उमेदवारीमुळे प्रचारात वेगळ्या रिअॅक्शन उमटताना दिसतेय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी असल्याचे राज ठाकरे म्हणाले. तर ज्यांनी धनुष्यबाण गहाण ठेवला. तो धनुष्यबाण आम्ही सोडवला असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दिलं. आता अचनाक राज ठाकरेंचा ट्रॅक बदलल्याचे पाहायला मिळतंय. गेल्या काही महिन्यात याच राज ठाकरेंच्या वर्षा या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक भेटीगाठी झाल्यात. पण आताच एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निशाण्यावर येण्याचं कारण म्हणजे माहीमची जागा… माहीममध्ये राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे हे विधानसभेच्या रिंगणात आहे. तर त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर उभे आहेत. त्यांनी माघार घ्यावी अशी भूमिका भाजपने घेतली पण त्यांनी माघार घेतली नाहीच. उलट राज ठाकरेंनी चर्चा न करता उमेदवार दिल्याचे शिंदे म्हणालेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 06, 2024 10:26 AM
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार, म्हणाले, ‘खोडा घालणाऱ्यांना जोडा…’
विधानसभेच्या प्रचाराचा पहिला गेअर पडला, ‘लाडकी बहीण’वरून ठाकरे अन् शिंदेंमध्ये जुंपली