Raj Thackeray यांच्या ‘त्या’ एका इशाऱ्यानंतर विना टोल वाहनं सुसाट !

| Updated on: Oct 10, 2023 | 11:45 AM

tv9 Special Report | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर वाहनं सुसाट धावताना पाहायला मिळाली. पनवेल, वाशी आणि मुलुंडमध्ये काही तास नो टोल.. मनसेचे कार्यकर्ते आणि मनसैनिक टोलनाक्यांवर धडकले अन् पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कारसह छोट्या वाहनांकडून टोलवसुली केल्यास टोलनाके जाळण्याचा इशारा दिला आणि इकडे, मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी थेट टोलनाक्यावर पोहोचले. टोलच्या विषयावरुन मनसे पुन्हा कशी आक्रमक झाली. पनवेलच्या टोलनाक्यावरुन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विना टोल छोटी वाहनं सोडण्यास सुरुवात केली. यावेळी टोलच्या कर्मचाऱ्यांसोबत मनसेच्या कार्यकर्त्यांची बाचाबाचीही झाली. मनसेमुळं विनाटोल वाहनं सोडल्यानं नागरिकांनाही एक दिवस का होईना बरं वाटलं. वाशी टोलनाक्यावरही मनसेच्या कार्यकर्त्यांनी विना टोल कारसह छोटी वाहनं सोडण्यास सुरुवात केली. तर ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मुलुंडच्या टोलनाक्यावर आले आणि सर्वच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी आहे, हे सांगणारा फडणवीसांचा व्हिडीओ चालकांना दाखवला. मात्र अविनाश जाधवांना पोलिसांनी रोखत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं जाधव आक्रमक झाले अखेर अविनाश जाधवांसह पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 10, 2023 11:45 AM
Ajit Pawar गटाचा शरद पवारांच्या नियुक्तीवर सवाल? सुनावणीत काय झाला आक्रमक युक्तिवाद?
दिल्लीत जावं या विधानापासून ते टोलपर्यंत, विरोधकांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस!