Special Report | मनसेचं इंजिन पुन्हा मराठी ट्रॅकवर? राज ठाकरे पुन्हा परप्रांतिय मुद्दा छेडणार?
VIDEO | मनसेचं इंजिन पुन्हा मराठी ट्रॅकवर, राज ठाकरे यांची भूमिका काय? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसे आता पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर ट्रॅकवर येण्याची चर्चा होतेय. तर नाले सफाईवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत येणाऱ्या परप्रांतिय लोंढ्यांकडे बोट दाखवलंय. तर आपतकालीन सुविधांवरून फटकेबाजीही राज ठाकरे यांनी केली. दादरमध्ये मनसेचा साधन सुविधा विभागाचा कार्यक्रम झाला. यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा परप्रांतियांचा मुद्दा छेडलाय. हिंदुत्वाचा मुद्दा घेताना मराठीच्या मुद्द्यावर मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्द्यावर हिंदू म्हणून मतं मांडणार असे राज ठाकरे म्हणाले. मात्र मागच्या सभांमध्ये अनधिकृत दर्गे, मशिदी, मशिदीवरचे भोंगे हे मनसेचे प्रमुख मुद्दे राहिले तर पहिल्यांदा मनसेने पुन्हा परप्रांतियांच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. बघा याबाबतचा स्पेशल रिपोर्ट
Published on: Jun 12, 2023 08:59 AM