Raj Thackeray : ‘शिवतीर्थ’वरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 नोव्हेंबरला राज ठाकरेंची सभा होणार की नाही?

| Updated on: Nov 15, 2024 | 3:45 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली. मुंबईतील वांद्रे MIG क्लब येथे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 17 नोव्हेंबरला होणाऱ्या शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावरील सभेसंदर्भात मोठी माहिती दिली, काय म्हणाले राज ठाकरे?

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसताय. अशातच नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यापूर्वी राज ठाकरेंनी 17 नोव्हेंबरला होणाऱ्या शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावरील सभेसंदर्भात मोठी माहिती दिली. “17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरची सभा आहे, पण ती आता होती म्हणावी लागेल. करण त्यासाठी सरकारकडून जी परवानगी मिळणं आवश्यक असतं, ती अजून मिळालेली नाही. फक्त दीड दिवस सभेसाठी उरला आहे. त्यात सभा करणं कठीण झालं आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरची सभा रद्द करत आहोत”, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली. मुंबईतील वांद्रे MIG क्लब येथे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही माहिती दिली. पुढे राज ठाकरे असंही म्हणाले, सभेला परवानगी मिळाली नाही हे सत्य आहे. राजकारण आहे की नाही माहिती नाही. जे उमेदवार कामाला लागले आहेत. त्यांचा दिवस निघून जातो. नियोजन करण्यासाठी संधी मिळाली असती तर नियोजन करणं सोपं जातं. दीड दिवसात आता शक्य नाही. दुसऱ्या दिवशी पाच वाजता प्रचार संपतोय. मलाही वेळ मिळेल. उमेदवारांनाही वेळ मिळेल, असं राज ठाकरे म्हणाले.

Published on: Nov 15, 2024 03:45 PM
Dhananjay Munde : ‘…मुली आणणार कुठून?’, मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
MNS Manifesto : ”आम्ही हे करु”, ‘मनसे’च्या जाहीरनाम्यात कोणासाठी नेमकं काय?