Raj Thackeray : भरसभेत राज ठाकरे उपस्थितांना सांगितलं, आज घरी गेल्यावर युट्युबवर सर्च करा…

| Updated on: Nov 11, 2024 | 10:10 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिंडोशी येथे प्रचारसभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. राज ठाकरे यांनी भरसभेत उपस्थित असलेल्यांना एक व्हिडीओ सर्च करा आणि बघा याचे आवाहन केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिंडोशी येथे प्रचारसभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्राबद्दलची स्वप्न काय आहेत हे बोलून दाखवलं. राज ठाकरे म्हणाले, आज घरी गेल्यावर राज ठाकरे असं युट्युबवर टाईप करा आणि पुढे Aesthetic असं लिहा… २०१४ ला माझी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत स्वप्न काय आहेत? यावर १६ मिनिटांची डॉक्युमेंट्री केली आहे. राज ठाकरे Aesthetic असं फक्त तुम्ही युट्युबवर सर्च करा आणि जी डॉक्युमेंट्री येते ती बघा…, असं आवाहन राज ठाकरेंनी भरसभेतून उपस्थितांना केलं. पुढे ते असे म्हणाले की, १९४७ सालापासून आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे. ज्याने आपल्या महाराष्ट्राची ब्लू प्रिंट जनतेसमोर आणली. कोणत्यातरी राजकीय पक्षाने आजपर्यंत केले का असे प्रयत्न? असा सवाल करत इतर राजकीय पक्षांवर राज ठाकरेंनी निशाणा साधला. ते म्हणाले, ‘यांच्या हातात ३०-४० वर्ष सत्ता आहे. पण प्रश्न संपायच्या ऐवजी वाढत आहेत. आयुष्यातील ५-५ वर्ष जात आहेत. माझा पूर्नजन्मावर विश्वास नाही. जे आहे ते हेच आयुष्य. कशासाठी मतदान करताय. तुम्हाला पर्याय मी देतोय. तुमच्यासमोर राज ठाकरे पर्याय म्हणून उभा आहे. झाले ते चांगलेच होणार आहे. माझे स्वप्न प्रामाणिक आहे.’, असंही राज ठाकरे म्हणाले.

Published on: Nov 11, 2024 10:10 PM
Raj Thackeray : राज ठाकरे यांनी भरसभेत दाखवलं ‘उर्दू’ भाषेतील ‘ते’ पत्र, उद्धव ठाकरे यांच्यावर संताप
Maha Survey : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचं सरकार येणार? महायुती की मविआ?