Raj Thackeray यांची पुन्हा ‘राज’गर्जना; म्हणाले, ‘माझ्या महाराष्ट्र सैनिकांचंही लक्ष असेल हे विसरू नका’
VIDEO | मराठी पाट्यांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. राज ठाकरे या निकालावर म्हणाले 'महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानावर ठळक मराठी पाटी हवी, तर मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचं लक्ष ठेवण्याचं काम'
मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ | मराठी पाट्यांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानावर ठळक मराठी पाटी हवी, असे राज ठाकरे यांनी स्पष्टच म्हटलं आहे. तर मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचं लक्ष ठेवण्याचं काम आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांचही लक्ष असणार आहे, हे विसरू नका, असे राज ठाकरे यांनी खडसावून सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. गेली अनेक वर्ष मराठी पाट्या या मुद्दयासाठी मनसे संघर्ष करत आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मान्यता मिळाली असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार’ असे राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.