माझ्या वाट्याला जावू नका, यांना दंगली हव्यात…राज ठाकरेंचा पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

| Updated on: Aug 11, 2024 | 11:05 AM

राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दंगली घडवायच्या आहेत, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मराठवाड्यात दौऱ्याला विरोध करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे नसून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे होते.

मराठवाडा दौऱ्यातील वादावरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार लक्ष्य केलंय. मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राज्यातील वातावरण दूषित करताय, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. तर आपल्याविरोधात धाराशीव, नांदेड, बीड या तीन ठिकाणी मराठा आंदोलकांनी जी आंदोलनं केलीत. त्यामागे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक नसून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. बीडमध्ये राज ठाकरे दौऱ्यावर आले होते. यावेळी आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या आणि सुपारीबहाद्दर चले जाव अशा घोषणाही दिल्या गेला. इतकंच नाहीतर मनसे कार्यकर्ते आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. यामध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी सुद्धा होते. दरम्यान, राज ठाकरेंविरोधातील आंदोलन हे पक्षीय नसून मराठा आरक्षण समर्थकांचं असल्याचा दावा, संजय राऊत यांनी केला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 11, 2024 11:05 AM
‘या’ ठिकाणी 100 टक्के पराभव, हा शब्द… त्यांच्या मतदारसंघात मराठ्यांचं मताधिक्य; जरांगेंनी चॅलेंज देत दिला गंभीर इशारा
बच्चू कडू ‘मविआ’च्या वाटेवर? घेतली शरद पवारांची भेट अन् केलं सूचक वक्तव्य, म्हणाले…