तर भारतात भोंगे बंद का होत नाहीत?’ गुढीपाडवा मेळाव्याआधीच राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मशिदीवरील भोंग्यांवरुन भाजपला थेट सवाल, बघा काय म्हणाले...
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा होणार आहे. उद्या राज ठाकरे कोणत्या मुद्यावरून विरोधकांवर लक्ष्य करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मनसेच्या वर्धापन दिन नुकताच पार पडला. यावेळी त्यांनी आपण आपली सविस्तर आणि रोखठोक भूमिका येत्या गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेत मांडणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान या सभेपूर्वीच राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे उद्याच्या सभेत राज ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडणार असल्याचे संकेत दिसताय. ‘सौदीमध्ये भोंगे बंद होऊ शकतात तर आपल्याकडे मोदी भोंगे बंद का करू शकत नाहीत? उद्या सभा आहेत. त्यात मी सविस्तर बोलेनच त्यामध्ये अजून कदाचित काहीतरी जास्तीत येईल’, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी आजच्या एका मुलाखतीत केलं आहे.