अजितदादांच्या PhD च्या ‘त्या’ वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी फटकारलं, म्हणाले….आणि तितकंच संतापजनक!
अजित पवार यांनी पीएचडी करून तरूण मुलं करतात काय? काय दिवे लावतात? असा सवाल केलाय. या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. अशातच मनसेने ट्वीट करत अजित पवार यांना चांगलंच फटकारल्याचे पाहायला मिळाले. मनसेनं ट्वीटमध्ये काय म्हटलंय ?
मुंबई, १३ डिसेंबर २०२३ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत भुवया उंचावणारं वक्तव्य केले. सारथी, महाज्योती, बार्टी या संस्थांमध्ये पीएचडी करण्यासाठी अॅडमिशन, शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी होत असताना काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अजित पवारांना काही सवाल केलेत. यावर अजित पवार यांनी पीएचडी करून तरूण मुलं करतात काय? काय दिवे लावतात? असा सवाल केलाय. या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. अशातच मनसेने ट्वीट करत अजित पवार यांना चांगलंच फटकारल्याचे पाहायला मिळाले. मनसेनं ट्वीटमध्ये असे म्हटले की, जाहिरातबाजी, मंत्र्यांची आलिशान दालनं, गाड्या, बंगले ह्यावर वायफळ खर्च करताना सरकारकडे निधी असतो मात्र सारथी, महाज्योती, बार्टी अशा संस्थांमधून बहुजन समाजाची मुलं उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागत असतील तर उप-उपमुख्यमंत्री म्हणणार ‘पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत?”