‘महाराष्ट्राची सर्कस झालीये, कोणाच्या मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या तर कोणाचे विदुषकी चाळे…’, राज ठाकरे नेमकं म्हणाले?

| Updated on: Oct 07, 2024 | 12:53 PM

पुण्यात मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आज करण्यात आलं. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना चांगलाचा हल्लाबोल केला.

महाराष्ट्राचा झालेला खेळ, महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, कोणी विदुषकी चाळे करत आहे, कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहेत. राज्यात कित्येक लोक राजकारणात अशी आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावली पाहिजे, असं म्हणत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून भाष्य करून राजकीय नेते मंडळींवरच निशाणा साधला. राज ठाकरे पुढे असेही म्हणाले, ‘राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, ज्या गोष्टींचं धरबंधन नाही अशा गोष्टी होतात तिथे त्यांना कानधरून जमिनीवर आणणं, शिकवणं सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे असं वाटतं. तुम्ही त्या अधिकारवाणीने बोलू शकता, सांगू शकतो’, असं म्हणत राज ठाकरेंनी साहित्यिकांचे कान टोचले. तर आम्ही बोललो तर ट्रोल होतो असा विचार करू नका. मी आजवर जे काही बोललो, भाषण केलं, सोशल मीडियावर त्यावर काय बोललं जातं ते मी कधी वाचत नाही. त्या भानगडीत पडत नाही. माझं बोलून झालं ना, मग विषय संपला, असेही पुढे राज ठाकरे म्हणाले.

Published on: Oct 07, 2024 12:53 PM
अब्दुल सत्तारांच्या साडी वाटपावरून रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, ‘बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?’
‘बुजुर्ग म्हणावं तर तेच त्यांच्या नादी…’, राज ठाकरे यांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा