महिला दिनानिमित्त राज ठाकरे यांची महिलांना साद, शुभेच्छा देत दिली मोठी ऑफर
VIDEO | जागतिक महिला दिनानिमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला वर्गाला शुभेच्छा, बघा काय म्हणाले राज ठाकरे...
मुंबई : आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. दरम्यान, जागतिक महिला दिनानिमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी महिलांसाठी एक खास पत्र लिहित जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांचं कौतुकही केलं आहे. महिला आज सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहेत. यशस्वी होत आहेत. त्याचं श्रेय फक्त आणि फक्त महिलांचंच आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. केवळ एवढं म्हणूनच राज ठाकरे थांबले नाहीत, तर त्यांनी महिलांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे. मनसे महिलांना संधी देण्यास तयार असल्याचंही म्हटलं आहे. बघा सविस्तर काय म्हणाले राज ठाकरे
Published on: Mar 08, 2023 02:44 PM