Special Report | कर्नाटक निकालावरून राज ठाकरे आणि भाजप आमने-सामने, भाजपच्या पराभवावर काय दिला सल्ला?

| Updated on: May 15, 2023 | 9:44 AM

VIDEO | कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना काय दिला सल्ला

मुंबई : जनतेला गृहित धरलं की काय होतं, हेच सांगणारा कर्नाटकचा निकाल असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. या टीकेला प्रत्युत्तर देत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले… आणि कर्नाटकाच्या निकाला नंतर पुन्हा ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. आमचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, असे मानणाऱ्यांसाठी कर्नाटकाचा निकाल आणि पराभव महत्त्वाचा आहे. असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. तर गेल्या काही दिवसांपूर्वी बारसूला विरोध दर्शवत राज ठाकरेंनी भूमिका व्यक्त केली. यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी जनतेला गृहित धरू नये, असा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात काँग्रेस जिंकली असली तर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी एव्हीएमवर शंका निर्माण केलीये. लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून राज्यांऐवजी एव्हीएमचा वापर फक्त लोकसभेत होतो, असा दावाही त्यांनी केलाय. कर्नाटकात निवडणुकीदरम्यान काही लोकांचा एव्हीएमविरोधातील राग उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 15, 2023 09:44 AM
खऱ्या अर्थाने ‘ऑपरेशन लोटस’ झालं, दैनिक ‘सामना’तून शिवसेनेनं भाजपला डिवचलं
Cabinet Expansion | पक्षप्रतोद गेल्यानंतर भरत गोगावले यांना मंत्रिपदाची अपेक्षा? काय केलं सूचक वक्तव्य