‘लाडक्या बहिणीं’ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा अन् राज ठाकरेंचा विरोध

| Updated on: Nov 07, 2024 | 11:00 AM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात जुंपली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना १५०० रूपयांवरून २१०० रूपये देणार असल्याचा वायदा दिला. यावर राज ठाकरेंनी टीका करत माझी सत्ता आल्यास काहीच फुकट देणार नसल्याचे म्हटलं. तर अशा लोकांच्या नादी लागू नका असं म्हणत महायुतीवर टीका केली.

पुन्हा महायुतीचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना १५०० रूपयांवरून २१०० रूपये देणार असल्याचा वायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. मात्र निकालानंतर भाजपसोबत जाणार असल्याची घोषणा कऱणाऱ्या राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडत फुकट काहीच मिळणार नाही. लोकसभेची निवडणूक होताच महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली आणि विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच महिलांच्या खात्यात चार महिन्यांचे साडे सात हजार रूपये जमाही केलेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना १५०० रूपयांवरून २१०० रूपये देणार असल्याचा वायदा केलाय. महाराष्ट्रात एकून ९ कोटी ५३ लाख मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी ४ कोटी ९३ लाख पुरूष तर महिला ४ कोटी ६० लाख आहेत. दरम्यान, आतापर्यंत २ कोटी ५० लाख महिलांनी लाडकी बहीण योजनाचा लाभ घेतलाय. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा धुव्वाधार प्रचार महायुतीकडून सुरू आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 07, 2024 11:00 AM
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मराठवाड्यातील सभेतून मनोज जरांगे पाटलांना सवाल, ‘आरक्षण कसं मिळेल?’
Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांचं जतमधल्या सभेत शरद पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य अन् टीकेची झोड