‘बुजुर्ग म्हणावं तर तेच त्यांच्या नादी…’, राज ठाकरे यांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा

| Updated on: Oct 07, 2024 | 1:11 PM

मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आज पुण्यात करण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरेंनी भाषणाद्वारे अनेक मुद्दे मांडले. साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभी करावी. साहित्यिकांनी राजकारण्यांना खडेबोल सुनावले पाहिजेत, असे आवाहन ठाकरे यांनी केलं

Follow us on

नुकतेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह अनेक आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवरून उड्या मारुन आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेवरून मनसे अध्य़क्ष राज ठाकरेंनी आज पुण्यात बोलताना जोरदार टीकास्त्र डागलंय. सध्या राजकारणाची जी स्थिती झाली आहे, त्यावरही त्यांनी भाष्य करत सडकून टीका केली. राजकारणाचा ढासळता स्तर, राजकारण्यांनी वापरलेली भाषा, खालच्या थराला जाऊन बोलणं या सर्व मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राजकारण्यांची भाषा खाली गेली आहे, खालच्या थराला जाऊन लोक बोलत आहेत, त्यांना समजावणारं कोणी नाही. ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी लागले आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. तर राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, ज्या गोष्टींचं धरबंधन नाही अशा गोष्टी होतात. तिथे त्यांना कानधरून जमिनीवर आणणं, शिकवणं सांगणं हे साहित्यिकांचं कर्तव्य आहे असं वाटतं. तुम्ही साहित्यिक त्या अधिकारवाणीने बोलू शकता, सांगू शकतात, असं राज ठाकरेंनी साहित्यिकांना उद्देशून म्हटले.