राज ठाकरे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्री शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?

| Updated on: Sep 23, 2024 | 5:04 PM

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यादोघांमध्ये जवळपास २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचे बोललं जात आहे.

Follow us on

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अद्याप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली नसली तरी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे पाहायला मिळतंय तर दुसरीकडे मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि चर्चासत्रही सुरु आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाल्यात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अॅक्शन मोडवर आले आहेत. राज ठाकरेंनी आज सोमवारी सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी त्यांनी शिंदेंची भेट घेतली. या भेटीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात साधारण २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. राज्यातील आणि मुंबईतील विकासकामं आणि राजकारण यासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मनसे नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपावरून चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र या भेटीमुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.