‘याआधी कधी असं नव्हत…’, राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका
आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात याआधी कधी असं जातीवादाचं विष नव्हतं, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे बघा व्हिडीओ
ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अशातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात याआधी कधी असं जातीवादाचं विष नव्हतं, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. तर जातीवादाचं विष पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘जातीपातीमधून काहीच होणार नाही, हे मी माझ्या भाषणातून आणि मुलाखतीतून नेहमी सांगत आलोय. सगळे पुढारी जातीपातीत द्वेष पसरवून फक्त मतं मिळवताय. लोकं त्यांना मतं देतीलही… त्यामुळे जातीचं राजकारण करणाऱ्यांना दूरच ठेवलं पाहिजे’, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. पुढे ते असेही म्हणाले की, जे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये सुरू आहे. तसंच उद्या राज्यात सुरू होईल, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.