सदा सरवणकरांनी व्यक्त केला खेद, म्हणाले; ‘राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण जर भेटले असते तर…’

| Updated on: Nov 04, 2024 | 5:10 PM

आता माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. सदा सरवणकरांनी विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा बोलून दाखवले, बघा काय म्हणाले सदा सरवणकर...

Follow us on

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता अवघे काही मिनिटं शिल्लक असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता अवघे काही मिनिटं बाकी होते. त्यादरम्यान सदा सरवणकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यासंदर्भात बोलताना सदा सरवणकर म्हणाले, मी पाच पाऊलांवर उभा होता. राज ठाकरेंनी मला बोलवलं असतं. तर मी भेटलो असतो. यावेळी जो निर्णय राज ठाकरेंनी दिला असता तो मी मान्य केला असता. पण त्यांनी भेट नाकरली, मला यावर आता काहीही बोलायचं नाही, तुम्हाला उभं राहिचं तर राहा. नसेल राहिचं तर नका राहू, असं राज ठाकरे यांनी म्हटल्याचे सरवणकर यांनी सांगितले. त्यामुळे निवडणूक लढणं ही आता काळाजी गरज आहे. पुढे सरवणकर असेही म्हणाले की, बाळासाहेबांची प्रतिकृती म्हणून आम्ही राज ठाकरे यांच्याकडे पाहतो. मात्र त्यांनी आज भेट नाकारली त्यामुळे खेद वाटतो. जर राज ठाकरे भेटले असते आणि त्यांनी जो आदेश दिला असता तो आम्ही पाळला असता असेच सरवणकर यांनी म्हटले आहे.