नेहरुंनतर नरेंद्र मोदी तिसरे पंतप्रधान बनणार, राज ठाकरेंची ‘शिवतीर्था’वरून थेट घोषणाच
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी मोदी सरकारने केलेल्या कामांचं कौतुक केलं. “पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे मोदीजी… सन्मानिय व्यासपीठ आणि तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो…”, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत महत्त्वाचा उल्लेख केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी मोदी सरकारने केलेल्या कामांचं कौतुक केलं. “पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे मोदीजी… सन्मानिय व्यासपीठ आणि तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो…”, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मोदी तुम्ही अनेकदा मुंबईत आलात. पण २१ वर्षावर आपण शिवतीर्थावर आलात. मला आठवतंय त्यावेळी तुम्ही कमळातून बाहेर आला होता. आणि २०१४ला आपण कमळ बाहेर काढलं. मी फार वेळ बोलणार नाही. मोदींचं भाषण ऐकायचं आहे. तीन टप्प्यात बोलणार आहे. एक टप्पा झाला आहे. पहिला टप्पा होता. मोदींची पाच वर्ष. त्यावर बोलायचं ते २०१९मध्ये बोलून गेलो. आता गेली पाच वर्ष. मला वाटतं देवेंद्र फडणवीस, अजितदादा शिंदे सर्वांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर वेळ घालवला. जे सत्तेत येणार नाही. त्यांच्याबद्दल का बोलत नाही. काही आवश्यकता नाहीये त्यांची. अनेक योजना आहेत. ज्या पाच वर्षात झाल्या नाहीत. मी सभेत म्हटलं टिकेच्यावेळी टीका प्रशंसेच्या वेळी प्रशंसा, असं राज ठाकरे म्हणाले.