चर्चा तर होणारच ना…राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, कुठं आले आमने-सामने?

| Updated on: Dec 22, 2023 | 6:55 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही राजकीय मैदानात एकमेकांवर तुफान हल्लाबोल करतात. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघांना एकत्र आणण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले. पण ते होऊ शकलं नाही.

मुंबई, 22 डिसेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही राजकीय मैदानात एकमेकांवर तुफान हल्लाबोल करतात. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघांना एकत्र आणण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले. पण ते होऊ शकलं नाही. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना दोन वेळा टाळी देण्याचा प्रयत्नही केला. पण उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्याचे कार्यकर्त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहिलं. आता हे बंधू राजकीयदृष्ट्या कधी एकत्र येतील हे काहीच सांगता येत नाही. मात्र, दिलासा देणारी बाब म्हणजे कुटुंब म्हणून दोन्ही बंधू अधूनमधून एकत्र येत असतात.

राज ठाकरे यांची बहीण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांचा साखरपुडा होता. दादरच्या एका मंगल कार्यालयात हा साखरपुडा पार पडला. यावेळी भाच्याच्या साखरपुड्यात अख्खं ठाकरे कुटुंब एकत्र आलं. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे आदी सोबत होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाच्याच्या साखरपुड्यात बाजूबाजूलाच उभे होते. साखरपुडा होताच दोघांनीही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

Published on: Dec 22, 2023 06:55 PM