अजित पवार पुण्यात नसतानाही धरण भरुन वाहिलंय, राज ठाकरेंचा दादांना टोला

| Updated on: Jul 29, 2024 | 5:03 PM

Raj Thackeray Criticise Deputy Cm Ajit Pawar : राज ठाकरे यांनी अजित पवारांना केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज ठाकरेंनी पुणे दौरा केला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दादांना लगावला टोला

पुण्यातील पूरस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. ‘राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे… ते त्या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय.’, असा खोचक टोलाच राज ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला आहे. तर पुण्यात अचानक पूर आला.. यामध्ये अजित पवार यांनी लक्ष घालायला नको का? असा सवालदेखील राज ठाकरे यांनी अजित पवारांना केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज ठाकरेंनी पुणे दौरा केला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. पुण्यातील नगरसेवकांनी यात जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचे आहे. ज्यांची इच्छा आहे, त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे. एखादा प्रकल्प आणायचा असेल तर सर्वांशी चर्चा का केली जात नाही? राजकीय पक्षांनी एकत्र बसले तर हा प्रश्न सुटेल. एकट्या पक्षाच काम नाही. दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्यातीलच आहे. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? असा प्रश्नही राज ठाकरेंनी यावेळी केला.

Published on: Jul 29, 2024 05:03 PM
उरणमधील मृत यशश्री शिंदेवर वार की अत्याचार? शवविच्छेदन अहवालातून मोठा उलगडा
विधानसभेला 288 उमेदवार पाडणार, जरांगे पाटलांच्या आव्हानावर पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर