निवडणुकीत डॉक्टर, नर्सेस मतदारांची नाडी मोजणार की डायपर बदलणार? आयोगावर राज ठाकरे बरसले

| Updated on: Apr 09, 2024 | 8:40 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून त्यांनी निवडणूक आयोगाची चांगलीच कान उघडणी केल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेसाठी डॉक्टर, नर्स यांना कामाला लावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुका तोंडावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून त्यांनी निवडणूक आयोगाची चांगलीच कान उघडणी केल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेसाठी डॉक्टर, नर्स यांना कामाला लावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. यावरूनच त्यांनी आयोगाला फटकारत डॉक्टर आणि नर्स यांनी त्यांचे काम करावे. तुम्हाला कोण नोकरीवरुन काढतो, तेच बघतो, असा दमच त्यांनी दिला. ‘जवळपास पाच वर्षानंतर या खासकरून महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. महापालिकेच्या निवडणुका आता होतील आता होतील असं म्हणता म्हणता अजूनही होत नाही. त्यामुळे २०१९ला ज्या निवडणुका झाल्या. त्यानंतर आज २०२४ ला निवडणुका होत आहेत. त्यामुळे आचारसंहितावाले जागे झाले, असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावला. पुढे ते म्हणाले, निवडणुकीसाठी म्हणून महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसला निवडणुकीच्या कामावर जुंपवलंय. डॉक्टर काय मतदारांची नाडी बघणार. की नर्सेस मतदारांचे डायपर बदलणार. आताच सांगतो डॉक्टर आणि नर्सेसने जाऊ नये. तुम्ही रुग्णालयात जा. काम करा. तुम्हाला नोकरीवरून कोण काढतं मी बघतो., असे राज ठाकरे म्हणाले.

Published on: Apr 09, 2024 08:40 PM
शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेआधी मनसेचे बडे नेते काय म्हणताय?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं नेतृत्व राज ठाकरेंकडे जाणार? काय केलं मोठं विधान?