‘मनाला वेदना… महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा असा कोसळतोच कसा?’, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर संताप

| Updated on: Aug 27, 2024 | 12:00 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. पण अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळला. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तर मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती? अशीही विचारणा राज ठाकरेंनी ट्वीटद्वारे केली आहे. ‘पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे.’, असे म्हणत राज ठाकरेंनी खंत व्यक्त केली आहे.

Published on: Aug 27, 2024 12:00 PM