Raj Thackeray : माझा शब्द म्हणजे शब्द, माझ्या हातात राज्याची सत्ता असेल तेव्हा… राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आजच्या राज्यकर्त्यांकडे सौंदर्यदृष्टीच नाही, त्यामुळे आपल्याकडे शहराचं व्यवस्थित प्लानिंग नाही, असे म्हणत राज ठाकरेंची टीका
पुणे, २१ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. आजच्या राज्यकर्त्यांकडे सौंदर्यदृष्टीच नाही, त्यामुळे आपल्याकडे शहराचं व्यवस्थित प्लानिंग होत नाही. तर महापालिकांमध्ये आर्किटेक्चरपेक्षा इंजिनीअरला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांवर सडकून टीका केली. ‘मी तुम्हाला शब्द देतो. माझा शब्द म्हणजे शब्द असतो मी इतर राज्यकर्त्यांसारखा नाही, असे म्हणत राज ठाकरे म्हणाले, जेव्हा माझ्या हातात महाराष्ट्र राज्याची सत्ता असेल तेव्हा या महाराष्ट्राचं संपूर्ण प्लानिंग करण्यासाठी आर्किटेक्ट लोकांच्या हातात त्याची जबाबदारी देईल’, असं मोठं विधान त्यांनी केलं. तर रामायणातील किस्सा सांगत बांद्रा वरळी सीलिंक बांधण्यासाठी लागलेल्या वेळेसंदर्भात आणि सरकारच्या कामाच्या वेगावर भाष्य करत राज ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे.