प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, राज ठाकरेंची तोफ उद्धव ठाकरेंवर धडाडली; गद्दार म्हणत…
महाराष्ट्र नविर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज लालबाग मेघवाडी येथे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी शेवटची प्रचार सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात उद्या (२० नोव्हेंबर रोजी) पार पडणार आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असताना ठाकरे बंधू हे भिडल्याचे पाहायला मिळाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गद्दार म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. तर गुजरात नवनिर्माण सेना म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचाच समाचार घेतलाय. शिवसेना सोडून गेलेल्यांना उद्धव ठाकरे गद्दार म्हणतात, पण तूच गद्दार आहेस, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय. इतकंच नाहीतर राज ठाकरेंनी मशिदींवरच्या भोंग्यावरून देखील घेरलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मशिदीवरील भोंगे मनसेने खाली आणले पण उद्धव ठाकरे आडवे आलेत, अशी टीका राज ठाकरेंनी केली. ‘या महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याबद्दल सांगितले आणि ते भोंगे खाली उतरवले आणि बंदही झालेत. भोंगे आम्ही भोंगे उतरवतो पण हनुमान चालीसा म्हणून नका… त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मागे कधी एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थ आणि अनेक सभांमधून अनेकदा सांगितले होतं मशिदींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत. जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?’असा सवाल करत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला.