Raj Thackeray : राज ठाकरे यांनी भरसभेत दाखवलं ‘उर्दू’ भाषेतील ‘ते’ पत्र, उद्धव ठाकरे यांच्यावर संताप

| Updated on: Nov 11, 2024 | 9:54 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिंडोशी येथे प्रचारसभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत सडकून टीका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिंडोशीत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना खोचक टोला लगावला. यावेळी राज ठाकरेंनी ठाकरे गटाच्या वर्सोवा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या नावाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, पाच वर्षांत जे काही घडलं ते तुम्ही पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक चिन्ह गेले. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत खान राहिले आहेत. वर्सोव्यात हारून खान यांना तिकीट दिले आहे. उद्धव ठाकरेंचे उमेदवार उर्दू पत्रक काढते आहेत. मराठवाड्यात म्हण होती बाण की खान. उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला आहे. फक्त राहिला आहे तो म्हणजे खान. वर्सोवा येथे ठाकरेंकडून उमेदवार हारून खान देण्यात आला. कडवट हिंदूत्व पासून ते कुठे गेले आहेत ? ते म्हणजे मुस्लिम उमेदवारापर्यंत गेली आहे. उर्दूमध्ये पत्र काढत आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी भर सभेत ‘उर्दू’मधील उमेदवाराचे पत्र वाचून दाखवले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही जाहीराती वर्तमान पत्रात टाकल्याचे सांगितले. यामध्ये त्यांनी इंग्रजी वर्तमान पत्रात देखील मराठी भाषेत जाहीरात दिल्याचे अभिमानाने सांगितले.

Published on: Nov 11, 2024 09:54 PM