उद्धव ठाकरेंचा ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’नुसार अमित ठाकरेंना पाठिंबा? माहिममध्ये एकही सभा नाही

| Updated on: Nov 08, 2024 | 10:37 AM

माहिम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरे माहिमध्ये सभा घेणार नाहीत. उद्धव ठाकरेंच्या सभांच्या यादीत माहिमचं नाव नाहीये. त्यावरूनच ठाकरेंना प्रश्न केल्यास मला सभा घेण्याची गरज नाही, असं उत्तर दिलंय.

Follow us on

माहिम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. मात्र त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेताना दिसत नाही, असा सवाल उद्धव ठाकरेंना केला असता आपल्याला तिथे सभा घेण्याची गरज नसल्याचं उत्तर त्यांनी दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यात. माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत हे उमेदवार उभे आहेत. पण माहिममध्ये मला सभेची आवश्यकता नाही असे सांगून उद्धव ठाकरेंना नेमकं काय म्हणायचं आहे? यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. तर २०१९ मध्ये वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देता राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे माझं कुटुंब माझी जबाबदारीनुसार, अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, असं भाजप नेते आशिष शेलार म्हणालेत. बघा स्पेशल रिपोर्ट