Uddhav Thackeray : अमित ठाकरे यांना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले….

| Updated on: Nov 13, 2024 | 10:39 AM

माहिम मतदारसंघात पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात असलेल्या राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा का नाही? याबद्दल पहिल्यांदाच टिव्ही ९ मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय.

शिवरायांची शपथ घेतो की महाराष्ट्र लुटणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्यांना कधीही पाठिंबा नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या पाठिंब्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. टिव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय की, अमित ठाकरेंना पाठिंबा नाही. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांना कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून वरळीमध्ये पाठिंबा दिला, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टिव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र माझं कुटुंब असून लुटारूंना मदत करणाऱ्य़ांना मदत नाही, असं स्पष्ट मत मांडलंय. दरम्यान, टिव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे सारखं लुटारू असा उल्लेख करत होते. त्यामुळे लुटारू नेमकं कोण? असा सवाल थेट उद्धव ठाकरेंना करण्यात आला. लुटारूंना उत्तर देताना आजारपणात नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंवरही उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे जाहीर भाषणातून उद्धव ठाकरेंना जनाब वरून घेरतायत, त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केलंय. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 13, 2024 10:39 AM
राज ठाकरेंच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची रिकामी, ‘मनसे’च्या सभेसाठी निमंत्रण, कारण…
भाजप आणि काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा स्वतःच्याच पक्षाला सवाल