मनसेचं ‘इंजिन’ शिंदेंच्या शिवसेनेसाठी ‘रेड’ अन् भाजपसाठी ‘ग्रीन’? राज ठाकरेंचा कोणाला पाठिंबा, कोणाला विरोध?

| Updated on: Nov 05, 2024 | 11:03 AM

मनसेच्या सभा आणि भूमिकांमधून सध्या महाविकास आघाडीबरोबरच आणि महायुतीतील शिंदेंची शिवसेना टीकेच्या अग्रस्थानी आहे. राज ठाकरे यांनी निकालानंतर मनसे भाजपसोबत सत्तेत राहिल, असं भाकित केल्यामुळे ते भाजपवर टीका करणं टाळत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यासगळ्यांचा केंद्रबिंदू हा माहीम मतदारसंघ असल्याचंही बोललं जात आहे.

राज ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या मनसे पाठिंब्यामुळे मुंबईमध्ये महायुतीतच वेगवेगळे सूर उमटतांना दिसताय. भाजपच्या प्रसाद लाड यांनी आपली भूमिका मांडताना आम्ही माहीममध्ये मनसेच्या अमित ठाकरेंचा प्रचार करू. तर नारायण राणे म्हणाले, भाजप शिंदे गटाच्या सरवणकरांचा प्रचार करणार आणि देवेंद्र फडणवीसांनी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत प्रचार सभा घेतल्या. तर विधानसभेच्या निकालानंतर मनसेच्या साथीनं भाजप सत्तेत येणार असा दावा केला. मात्र राज्यात महायुतीसह भाजपविरोधात देखील मनसेने आपले उमेदवार उभे केलेत. शिवडीमध्ये युतीचा पाठिंबा मात्र माहीममध्ये पाठिंबा नसल्याचे चित्र सध्या आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसेच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री होण्याचं भाकीत केलं आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साईडलाईन केलं. आपण दुसऱ्याचं पक्ष आणि चिन्ह ढापलं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 05, 2024 11:03 AM
Satej Patil : उ. कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार अन् सतेज पाटील भडकले, ‘दम नव्हता तर xx…’
सदा सरवणकरांची माघार नाहीच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव पण…; राज ठाकरेंच्या घरी नेमकं काय झालं?