बिनशर्त पाठिंबा, ना राज्यसभा ना विधानपरिषद; धनुष्यबाणामुळे मनसेची महायुतीत एन्ट्री फिस्कटली?
फक्त आणि फक्त मोदींना मदत करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली. तर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीत का आला नाही, हे देखील राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं. मला आपल्या चिन्हावर लढा हे सांगितलं पण ते मला मान्य नव्हतं. रेल्वे इंजिन चिन्हासोबत तडजोड नाही असं म्हटलं.
राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून चिन्हावरून तडजोड नाही, असं वक्तव्य केलं होतं. मात्र ते चिन्ह भाजपचं कमळ नाहीतर शिवसेनेचं धनुष्यबाण होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. फक्त आणि फक्त मोदींना मदत करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली. तर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीत का आला नाही, हे देखील राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं. मला आपल्या चिन्हावर लढा हे सांगितलं पण ते मला मान्य नव्हतं. रेल्वे इंजिन चिन्हासोबत तडजोड नाही असं म्हटलं. तर भाजपच्या कमळ या चिन्हामुळे नाहीतर शिवसेनेच्या धनुष्यबाणामुळे मनसेची महायुतीत एन्ट्री फिस्कटली असं कळतंय. अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरे यांची दिल्लीत बैठक झाली त्यावेळी लोकसभेच्या दोन जागा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रमुख नेत्याशी बोला असं शहांनी त्यांना सांगितलं. मात्र रेल्वे इंजिनशिवाय लढणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले….बघा नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?