‘अन् शर्मिलाला कुत्रा चावला’, राज ठाकरे यांनी सांगितला श्वानप्रेमाचा किस्सा

| Updated on: Mar 23, 2023 | 4:24 PM

VIDEO | प्रेस कॉन्फरन्सला जाणार आणि तेवढ्यात दुसरीकडे बायकोला कुत्र्यानं चावा घेतला... एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा

मुंबई : मुंबईमधील सायन रुग्णालयाच्या मराठी वाङ्‌मय मंडळातर्फे आयोजित वसंतोत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य करत विविध मुद्यांना स्पर्श केला. राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना श्वानप्रेम प्रचंड असल्याचे साऱ्यांना माहित आहे. इतकेच नाही तर सध्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सात ते आठ श्वान देखील आहेत. दरम्यान, या प्रकट मुलाखतीत राज ठाकरे यांनी त्यांच्या श्वानप्रेमाचा किस्सा सांगितला. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी कुत्रा चावल्याचाही किस्सा रसिक, प्रेक्षकांना सांगितला. गेल्या काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलवली होती आणि या पत्रकारपरिषदेच्या आधी घरातील पाळीव कुत्र्यांनं त्यांच्या पत्नी शर्मिला यांना चावा घेतल्याची घटना घडली होती.  कोणता होता तो किस्सा बघा…

Published on: Mar 23, 2023 04:23 PM
विधिमंडळाच्या आवारातील ‘जोडे मारो’ आंदोलनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
चिमुकल्याचा अनोखा रेकॉर्ड, वाढदिवसाच्या दिवशी ५१ किलोमीटर केले सायकलिंग