… मग हेच औदार्य बाळासाहेबांना भारतरत्न घोषित करून दाखवा, राज ठाकरेंची मागणी काय?

| Updated on: Feb 09, 2024 | 5:58 PM

'केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी बाळासाहेबांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं.' मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदे सरकारकडे मागणी केली आहे.

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४ : बाळासाहेबांना भारतरत्न मिळायला हवा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदे सरकारकडे ही मागणी केली आहे. ‘माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो. बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी बाळासाहेबांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय…अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल. ‘, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 09, 2024 05:58 PM
अरे देवा! चंद्रकांत पाटील म्हणताय महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे!
महेश गायकवाड यांच्यासह तब्बल 70 जणांविरोधात गुन्हा, काय आहे प्रकरण?