‘भाषणावेळी मला प्रचंड घाम फुटतो’, राज ठाकरे यांनी सांगितला भाषण करतानाचा ‘तो’ पहिला किस्सा
VIDEO | आयुष्यातील पहिलं भाषण आणि बालपणी मिळालेला बाळासाहेब ठाकरे यांचा सल्ला, राज ठाकरे यांनी सांगितला 'त्या' भाषणाचा किस्सा
मुंबई : राजकीय भाषण म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आताचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव. तसं पाहायला गेलं तर ठाकरे घराणं आणि ठाकरे घराण्यातील भाषण, वक्तृत्व शैली याचं अनोखं नातं आहे. बाळासाहेबांकडूनच राज ठाकरे यांना वक्तृत्वाचा हा वारसा आल्याचे म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का राज ठाकरे यांच्याकडे वक्तृत्वाचे गुण आले कसे? त्यांनी पहिलं भाषण कधी आणि कुठं केलं? प्रत्येक भाषण दणक्यात आणि जोरदार करणाऱ्या राज ठाकरे यांना भाषणावेळी घाम फुटतो हे ऐकलं तर तुम्हाला अतिश्योक्ती वाटेल पण हेच राज ठाकरे यांनी स्वतः सांगितले आहे. काय आहे तो किस्सा? राज ठाकरे यांनी आज व्हिजेटीआय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या भाषणाचा पहिला किस्सा सांगितला आहे. बघा काय म्हणाले राज ठाकरे…
Published on: Feb 19, 2023 08:56 PM