आम्ही मनसेचे कट्टर पण त्यांनी आमच्या विठ्ठलाला भेटू दिले नाही… हिंगोलीत मनसैनिकांकडून खदखद व्यक्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनैनिकांकडून हिंगोलीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं.हिंगोलीमधील शासकीय विश्रामगृहात राज ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये स्वागतासाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराची स्टील ग्रील तुटल्याने मनसेचे कार्यकर्ते कोसळल्याचेही पाहायला मिळाले.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन राजकीय नेते मंडळींनी आपले दौरे, यात्रा सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे देखील मराठावाडा दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर, धाराशिव, लातूर दौरा करुन ते आज हिंगोली जिल्ह्यात दाखल झालेत. हिंगोलीत राज ठाकरेंचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्यावर जेसीबीने फुलांची उधळण करून हिंगोली मनसैनिकांनी सन्मान केला. राज ठाकरे यांचे हिंगोलीमध्ये आगमन झालं. शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये स्वागतासाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. अशातच राज ठाकरे यांची भेट न होऊ दिल्याने एका कट्टर मनसैनिकाची खदखद बाहेर पडली आहे. राज ठाकरे शासकीय विश्राम गृहाबाहेर पडताच जिल्हा उपाध्यक्षांनी लांबून आलेल्या आमच्या विठ्ठलाला भेटू दिले नाही, असे म्हणत खदखद व्यक्त केली. तर भेट झाली नाही म्हणून मनसैनिक विनोद बांगर यांनी नाराजीही व्यक्त केली.