राज ठाकरेंचे दणक्यात स्वागत, भेटीसाठी मनसे कार्यकर्त्यांची झुंबड; गर्दीमुळे लोखंडी ग्रील तुटलं अन्…

| Updated on: Aug 08, 2024 | 4:34 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आगामी दोन महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणावरील राज ठाकरेंची भूमिका त्यांमुळे त्यांचा नांदेड आणि हिंगोली दौरा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत, काल नांदेड येथे मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली, ते नांदेड येथे मुक्काम असलेल्या सिटी प्राईड हॉटेलाही मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच नांदेड हिंगोली महामार्गावर मराठा बहुल गावाच्या पाटीवर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला, नांदेडपासून जवळ असलेल्या महादेव पिंपळगाव गावाजवळ पोलिसांनी खडा पहारा दिला होता, मराठा आरक्षण चळवळीत हे गाव आक्रमक असल्याने पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, आज नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंचं हिंगोलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जंगी स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंना भेटण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अशातच हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात थांबलेल्या ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची तेथे झुंबड उडाली. त्यामुळे स्टीलची ग्रील तुटल्याचे पाहायला मिळाले. हे ग्रील तुटल्यानंतर कित्येक कार्यकर्ते खाली कोसळले आणि एकमेकांच्या अंगावर पडले.

Published on: Aug 08, 2024 04:34 PM
Maharashtra Weather Update : आठवड्याच्या शेवटी पाऊस झोडपणार? काय सांगतंय हवामान खातं? कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
भाजप आमदाराच्या नावानं चिठ्ठी अन् तरूणाची आत्महत्या, चिठ्ठीत जे काही म्हटलं त्यानं उडाली खळबळ