राज ठाकरे यांना मारण्याची सुपारी दिली होती, मनसे नेत्यानं काय केला गौप्यस्फोट?
VIDEO | राज ठाकरे यांना मारण्याची सुपारी दिली होती, कुठं आणि कुणी दिलेली; मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट, बघा व्हिडीओ
मुंबई : मुंबईतल्या गुंडांना शिवसेनेच्या माध्यमातून राज ठाकरेंची सुपारी दिली होती. मालवणमध्ये राज ठाकरेंच्या घातपाताचं षडयंत्र होतं. नारायण राणे यांच्यावर नाव येण्यासाठी मालवणमध्ये घातपाताचं षडयंत्र आखलं होतं.आपल्या पक्षातील प्रतिस्पर्धीचा काटा काढता येईल, अशाप्रकारचं नीच राजकारण झालं होतं, असे वक्तव्य करून मनसे नेता संदीप देशपांडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नारायण राणे यांनी बंड केलं तेव्हा शिवसैनिकांची मालवणमध्ये जाण्याची हिंमत नव्हती, असेही संदीप देशपांडे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, राज ठाकरेंचे नाव जेव्हा बाळासाहेबांच्या नंतरचा नेता म्हणून पुढे येत होते, तेव्हा 1995 ते 2000 पर्यंत त्यांच्या विरोधात षडयंत्र रचायला सुरुवात झाली. 2000 साली उद्धव ठाकरेंची अस्वस्थता वाढायला लागली. 2002 मध्ये बाळासाहेबांच्या इच्छेखातर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचे नाव कार्याध्यक्ष म्हणून घोषित केल्याचेही त्यांनी म्हटले.