यंदाच्या निवडणुकीत इतिहास घडणार, 18 वर्षानंतर राज ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी प्रचार करणार
युती-आघाडीच्या नव्या समीकरणामुळे दोन ते तीन दशकानंतर नवी समीकरण दिसणार... महाराष्ट्रात युती-आघाड्या नव्या आहेत. २००६ ला शिवसेनेत मतभेद होऊन राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. मात्र यंदा तब्बल १८ वर्षांनंतर २०२४ मध्ये शिवसेनेच्याच धनुष्यबाणाचा प्रचार करताना दिसणार आहेत.
दोन पक्षांची यंदा चिन्ह बदलल्यामुळे महाराष्ट्राच्या समीकरणांचं चित्र सुद्धा बदलल्याचे पाहायला मिळणार आहे. युती-आघाडीच्या नव्या समीकरणामुळे दोन ते तीन दशकानंतर नवी समीकरण दिसणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत अनेक इतिहास घडताना दिसणार आहे. राज ठाकरे यांनी काल परवा मोदींसाठी भाजप, अजित पवार आणि शिंदेंना पाठिंबा दिला. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्राचा कॅरम चुकीचा फुटल्याचे ते म्हणाले होते. महाराष्ट्रात युती-आघाड्या नव्या आहेत. २००६ ला शिवसेनेत मतभेद होऊन राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. मात्र यंदा तब्बल १८ वर्षांनंतर २०२४ मध्ये शिवसेनेच्याच धनुष्यबाणाचा प्रचार करताना दिसणार आहेत. १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. तर यंदा २५ वर्षांनंतर शरद पवार पहिल्यांदा घड्याळ्याविरोधात मैदानात आहेत. तर १९८८ साली शिवसेनेचा धनुष्यबाणावर निवडणूर लढवत आलीये. मात्र ३६ वर्षानंतर २०२४ मध्ये शिंदेंच्या धनुष्यबाणाविरोधात निवडणुकीत उतरलेत, बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट….